रविवार, १० एप्रिल, २०१६


सुरगाणा राजकीय
(ग्रामपंचायत निवडणुका -२०१६ )
 सुरगाणा तालुक्यातील ग्रामपंचायती निवडणुकीसंदर्भात उमेद्वारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ६० पैकी १२ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध निवड झाली. यामध्ये माकपच्या ७, शिवसेनेच्या २ तर भाजपची १ आणि ग्रामस्थांनी स्वत: निर्णय घेतलेल्या नवीन हरणटेकडी ग्रामपंचायतीचा समावेश आहे. तालुक्यात ६१ ग्रामपंचायत असून यापैकी खोबळा ग्रा.पं. वगळता ६० ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. येत्या १७ एप्रिल रोजी मतदान, तर दुसर्‍या दिवशी दि.१८ रोजी मतमोजणी होणार आहे. गुरुवार दि.२१ रोजी जिल्हाधिकारी हे अधिकृतपणे ग्रामपंचायतीचा निकाल प्रसिध्द करतील. पूर्णपणे बिनविरोध निवडणूक झालेल्या माकपच्या ग्रामपंचायत व सदस्य संख्या अलंगुण -११, हातरुंडी-९, कोठुळा-७, घोडांबे-७, हरणटेकडी-७, भोरमाळ-९, करंजुळ (सु)-७, खिरडी-११ सदस्य, शिवसेना-उंबरपाडा (दि)-७, राहुडे-७ सदस्य आणि भाजपची प्रतापगड- ९ सदस्य तर ंहरटेकडी ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय स्वत: ग्रामस्थांनीच घेतल्याचे समजते. बिनविरोध निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतीत सदस्य, कार्यकर्ते, नागरिकांनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला. तालुक्यात यापुर्वी एकूण ५८ ग्रामपंचायती होत्या. यावेळी वाघधोंड, हरणटेकडी, लाडगांव व मोहपाडा या ४ नवीन ग्रामपंचायतीची निर्मिती झाल्याने ग्रामपंचायतीची संख्या ६२ झाली. सुरगाणा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झाल्याने तालुक्यात ६१ ग्रामपंचायत अस्तित्वात असून त्यापैकी खोबळा ग्रामपंचायतीची निवडणूक सहा महिने उशीरा होणार असल्याने ही ग्रा.पं.वगळता ६० ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यापैकी ११ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. नवनिर्मित हरणटेकडी ग्रामपंचायतीने पहिलीच निवडणूक ग्रामस्थांच्या एकमताने बिनविरोध केली. त्यामुळे होणारा खर्च, प्रशासनाचा वेळ इत्यादीची बचत झाली आहे. या ग्रामपंचायतीमध्ये हरणटेकडी व गाळपाडा ही दोन गावे असून कोणत्याही पक्षाचे नेतृत्व न घेता दोन्ही गावाच्या ग्रामस्थांनी एकविचाराने ही पहिलीच निवडणूक बिनविरोध निवडणूक आलेले सदस्य मनाजी पवार यांनी सांगितले. निवडणूक बिनविरोध केल्याने ही ग्रामपंचायत आणि इतर १० ग्रामपंचायत देखील कौतुकास पात्र ठरल्या आहेत
                                                                                                                                          

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा