मंगळवार, १९ एप्रिल, २०१६

ग्रामपंचायत  निवडणुका  निकाल

एकुण ग्रामपंचायती-60


(1) अलंगुण- बिनविरोध (माकप) 11 सदस्य 
(2) खिर्डी - बिनविरोध (माकप) 11 सदस्य
(3) हातरूंडी - बिनविरोध (माकप) 9 सदस्य

(4) भोरमाळ -बिनविरोध (माकप) 9 सदस्य

(5) आंबाठा - बिनविरोध ( माकप) 9 सदस्य

(6)कोटूळा - बिनविरोध (माकप) 7 सदस्य

(7) करंजुल (सु)- बिनविरोध ( माकप ) 7 सदस्य

(8) घोडांबे -बिनविरोध ( माकप ) सदस्य

(9) रगतविहीर- 9 पैकी 9 (माकप )

(10)काठीपाडा- 13 पैकी 13 ( माकप )

(11) राशा - 7 पैकी 7 (माकप )

( 12) बिव्हळ - 9 पैकी 9 (माकप )

(13) पोहाळी - 4 पैकी 4 (माकप ) 3 जागा रिक्त

(14) गोंदुणे - 17 पैकी 14 (माकप ) 2 जागा रिक्त

(15) उंबरठाण- 13 पैकी 12 ( माकप )

( 16) म्हैसखडक - 9 पैकी 7 ( माकप )

( 17) डोल्हारा - 9 पैकी 5 (माकप )

( 18) खुटंविहीर - 11 पैकी 6 (माकप )

( 19) भवानदगड - 7 पैकी 5 (माकप )

( 20) खोकरी - 9 पैकी 5 (माकप )

(21) भदर - 15 पैकी 14 (माकप )

( 22) पळसन - 15 पैकी 11 (माकप )

( 23) माणी - 11 पैकी 8 (माकप )

( 24 ) कुकडमुंडा -9 पैकी 6 (माकप )

( 25) ओरंभे- 7 पैकी 5 ( माकप )

( 26) मांगदे - 9 पैकी 8 ( माकप )

( 27) मनखेड - 9 पैकी 5 ( माकप )

( 28 ) रोंघाणे - 11 पैकी 8 ( माकप )

( 29 ) हेमाडपाडा - 9 पैकी 5 ( माकप )

( 30) हस्ते - 9 पैकी 5 ( माकप )

( 31) कळमणे - 11 पैकी 8 ( माकप )

(32) अंबोडे - 13 पैकी 9 ( माकप )

( 33) हट्टी - 15 पैकी 13 ( माकप )

( 34) वाघधोंड - 9 पैकी 7 ( माकप )

( 35) माळेगाव - 9 पैकी 5 ( माकप )

( 36) डांगराळे - 9 पैकी 6 ( माकप )

( 37) मोहपाडा- 7 पैकी 6 ( माकप )

( 38) चिकाडी - 9 पैकी 5 ( माकप )

( 39) हतगड - 11 पैकी 8 ( माकप )

( 40) ठाणगाव - 9 पैकी 5 ( माकप )

( 41) मांदा - 7 पैकी 2 ( माकप ) 5 इतर

(42) चिंचपाडा - 9 पैकी 3 (माकप ) 6 इतर

(43) कुकूडणे -9 पैकी 4 ( माकप ) 5 इतर

( 44) भवाडा - 17 पैकी 8 ( माकप ) 9 इतर

(45) बेडशे - 9 पैकी 4 ( माकप ) 5 इतर

(46) बारे - 13 पैकी 5 ( माकप ) 4( सेना) 4(राकाॅ)

( 47) जाहुले - 9 पैकी 3 ( माकप ) इतर 6

(48) लाडगाव - 9 पैकी 3 ( माकप ) 6 इतर

(49) बुबळी -7 पैकी 1 ( माकप ) इतर 6

(50) नागशेवडी - 11 पैकी 5 ( माकप ) 6 इतर

( 51) शिंदे - 9 पैकी 3 ( माकप ) 6 इतर

( 52) सराड - 9 पैकी 1 ( माकप ) 4 (सेना ) 1 (राकाँ) 3 ( काँग्रेस )

( 53) राहुडा - बिनविरोध (सेना)

( 54) उंबरपाडा (दि )- बिनविरोध ( सेना)

( 55) प्रतापगड - बिनविरोध ( भाजप )

( 56) हरनटेकडी - बिनविरोध ( अपक्ष गाव आघाडी )

( 57 ) बोरगाव - 11 पैकी 1 ( माकप ) 10 इतर

(58) साजोळे - पुर्ण विरोधी

(59) मालगव्हाण - भाजपा

(60) रोकडपाडा - 9 पैकी 2 ( माकप ) 7 इतर

सुरगाणा तालुक्यातील एकुन 60 ग्रामपंचायती पैकी 40 ग्रामपंचायती व 591 सदस्या पैकी 8 रिक्त जागा सोडून 352 सदस्य जिंकून माकपाने आपली ग्रामीण भागातील पक्कड मजबूत करून 72% ग्रामीण सत्ता आपल्या बाजूने जिंकलेली आहे 

रविवार, १० एप्रिल, २०१६


सुरगाणा राजकीय
(ग्रामपंचायत निवडणुका -२०१६ )
 सुरगाणा तालुक्यातील ग्रामपंचायती निवडणुकीसंदर्भात उमेद्वारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ६० पैकी १२ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध निवड झाली. यामध्ये माकपच्या ७, शिवसेनेच्या २ तर भाजपची १ आणि ग्रामस्थांनी स्वत: निर्णय घेतलेल्या नवीन हरणटेकडी ग्रामपंचायतीचा समावेश आहे. तालुक्यात ६१ ग्रामपंचायत असून यापैकी खोबळा ग्रा.पं. वगळता ६० ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. येत्या १७ एप्रिल रोजी मतदान, तर दुसर्‍या दिवशी दि.१८ रोजी मतमोजणी होणार आहे. गुरुवार दि.२१ रोजी जिल्हाधिकारी हे अधिकृतपणे ग्रामपंचायतीचा निकाल प्रसिध्द करतील. पूर्णपणे बिनविरोध निवडणूक झालेल्या माकपच्या ग्रामपंचायत व सदस्य संख्या अलंगुण -११, हातरुंडी-९, कोठुळा-७, घोडांबे-७, हरणटेकडी-७, भोरमाळ-९, करंजुळ (सु)-७, खिरडी-११ सदस्य, शिवसेना-उंबरपाडा (दि)-७, राहुडे-७ सदस्य आणि भाजपची प्रतापगड- ९ सदस्य तर ंहरटेकडी ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय स्वत: ग्रामस्थांनीच घेतल्याचे समजते. बिनविरोध निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतीत सदस्य, कार्यकर्ते, नागरिकांनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला. तालुक्यात यापुर्वी एकूण ५८ ग्रामपंचायती होत्या. यावेळी वाघधोंड, हरणटेकडी, लाडगांव व मोहपाडा या ४ नवीन ग्रामपंचायतीची निर्मिती झाल्याने ग्रामपंचायतीची संख्या ६२ झाली. सुरगाणा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झाल्याने तालुक्यात ६१ ग्रामपंचायत अस्तित्वात असून त्यापैकी खोबळा ग्रामपंचायतीची निवडणूक सहा महिने उशीरा होणार असल्याने ही ग्रा.पं.वगळता ६० ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यापैकी ११ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. नवनिर्मित हरणटेकडी ग्रामपंचायतीने पहिलीच निवडणूक ग्रामस्थांच्या एकमताने बिनविरोध केली. त्यामुळे होणारा खर्च, प्रशासनाचा वेळ इत्यादीची बचत झाली आहे. या ग्रामपंचायतीमध्ये हरणटेकडी व गाळपाडा ही दोन गावे असून कोणत्याही पक्षाचे नेतृत्व न घेता दोन्ही गावाच्या ग्रामस्थांनी एकविचाराने ही पहिलीच निवडणूक बिनविरोध निवडणूक आलेले सदस्य मनाजी पवार यांनी सांगितले. निवडणूक बिनविरोध केल्याने ही ग्रामपंचायत आणि इतर १० ग्रामपंचायत देखील कौतुकास पात्र ठरल्या आहेत