बुधवार, ४ सप्टेंबर, २०१३

खेडे गावातील गणेश उत्सवाची गोष्ट.................................

      रस्त्यावरील गाड्यांमधून  ,प्रत्येक दुकानातून ,गल्लीतून ,राजकीय व्क्तीकडून पैसे घेऊन एकाच शहरात अनेक गणेश मंडले स्थापन करून टिळकांचे स्वप्न पूर्ण होणार नाही , तर ते धुळीस मिळेल .............


    तोच गणेश उत्सव जर खेडेगावात बघितला तर एक गाव एक गणपती (मंडळ ) आणि त्यातूनच टिळकांचे ध्येय पूर्ण होण्यास मदत होईल .आज एका शहरात अनेक गणेश मंडले स्थापन झालेले आपणास दिसून येतात व त्याच्यामुळे मंडळा - मंडला मध्ये वाद निर्माण होतात .तेच  खेडेगावात एकच गणेश मंडळ असल्यामुळे सर्व नागरिक मंदिरात जमतात व विघ्नहर्ताची स्थापना करतात व पुढील दहा दिवस रोज संध्याकाळी भजन करत असतात . गावातील सुख -दुखाच्या गोष्टी करतात . एखाद्याला अडचण असली तर सर्व जन एकत्र येऊन त्याची अडचण दूर करण्याचा प्रयत्न करतात .

        खेडे गावात गणेश उत्सवासाठी लागणारा पैसा हा प्रत्येक घरातून आर्थिक परिस्थितीनुसार प्रत्येकाच्या स्वइच्छेने एहाद्या विश्वासू नागरिकाकडे जमा केले जातात.
पुढील दहा दिवस झाल्यावर सर्व गणेश विसर्जनाच्या दिवशी  गावातील सर्व नागरिक एका ठिकाणी जमतात व वाजत गाजत विसर्जन करतात . विसर्जन झाल्यावर  प्रत्येक घरी प्रसाद दिला जातो
..........................या उत्सवात स्पर्धा नसतेच पण सहकार्याची भावना असते जिव्हाळा असतो शहरातील मंडळांप्रमाने चढाओढ नसते .....................आणि हीच खरी खेडे गावातील गणेश उत्सवाची गोष्ट.................................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा