बुधवार, ४ सप्टेंबर, २०१३

खेडे गावातील गणेश उत्सवाची गोष्ट.................................

      रस्त्यावरील गाड्यांमधून  ,प्रत्येक दुकानातून ,गल्लीतून ,राजकीय व्क्तीकडून पैसे घेऊन एकाच शहरात अनेक गणेश मंडले स्थापन करून टिळकांचे स्वप्न पूर्ण होणार नाही , तर ते धुळीस मिळेल .............


    तोच गणेश उत्सव जर खेडेगावात बघितला तर एक गाव एक गणपती (मंडळ ) आणि त्यातूनच टिळकांचे ध्येय पूर्ण होण्यास मदत होईल .आज एका शहरात अनेक गणेश मंडले स्थापन झालेले आपणास दिसून येतात व त्याच्यामुळे मंडळा - मंडला मध्ये वाद निर्माण होतात .तेच  खेडेगावात एकच गणेश मंडळ असल्यामुळे सर्व नागरिक मंदिरात जमतात व विघ्नहर्ताची स्थापना करतात व पुढील दहा दिवस रोज संध्याकाळी भजन करत असतात . गावातील सुख -दुखाच्या गोष्टी करतात . एखाद्याला अडचण असली तर सर्व जन एकत्र येऊन त्याची अडचण दूर करण्याचा प्रयत्न करतात .

        खेडे गावात गणेश उत्सवासाठी लागणारा पैसा हा प्रत्येक घरातून आर्थिक परिस्थितीनुसार प्रत्येकाच्या स्वइच्छेने एहाद्या विश्वासू नागरिकाकडे जमा केले जातात.
पुढील दहा दिवस झाल्यावर सर्व गणेश विसर्जनाच्या दिवशी  गावातील सर्व नागरिक एका ठिकाणी जमतात व वाजत गाजत विसर्जन करतात . विसर्जन झाल्यावर  प्रत्येक घरी प्रसाद दिला जातो
..........................या उत्सवात स्पर्धा नसतेच पण सहकार्याची भावना असते जिव्हाळा असतो शहरातील मंडळांप्रमाने चढाओढ नसते .....................आणि हीच खरी खेडे गावातील गणेश उत्सवाची गोष्ट.................................

मंगळवार, २३ जुलै, २०१३

                                 सुरगाणा तालुक्यातील प्रेक्षणीय स्थळे 

भिवतास धबधबा

 

 भिवातास धबधबा हा सुरगाणा तालुक्यातील एक प्रसिद्ध असा हा धबधबा सुरगाणा तालुक्यापासून
 ४० कि . मी . अंतरावर आहे  .हा धबधबा पाहायला जाण्यासाठी सुर्गाण्यापासून जीपची सुविधा आहे 


गुरुवार, ४ जुलै, २०१३

सुरगाणा कृषी विभाग

                                                            सुरगाणा कृषी विभाग 


सुरगाणा तालुक्यातील पिकांचे क्षेत्र

■ पीक- भात, सरासरीक्षेत्र-८५00, पेरणी-९७८, नागली-सरासरी क्षेत्र-८३00, पेरणी-८३0.
इतर - तृणधान्य- सरासरी क्षेत्र- २९00, पेरणी-२0३0, तूर-सरासरी क्षेत्र-१३00, पेरणी-६00, टक्केवारी-४६%, मूग-सरासरी क्षेत्र-१00, पेरणी-१00, टक्केवारी-१00%, उडीद- सरासरी क्षेत्र- ९00, पेरणी-७८0, टक्केवारी -८७ %, इतर ख. कडधान्य-सरासरी क्षेत्र-१३00, पेरणी-१२00, टक्केवारी-९२ %, भुईमूग- सरासरी क्षेत्र- ९00, पेरणी-८७0, टक्केवारी- ९७ %, खुरसणी-सरासरी क्षेत्र-३३00, पेरणी-२५00, टक्केवारी-७६%, सोयाबीन- सरासरी क्षेत्र- २00, पेरणी-१५0, टक्केवारी-७५ %, सूर्यफूल- पेरणी-२६, इतर ख. गळीतधान्य-सरासरी क्षेत्र-२00, एकूण खरीप हंगाम - २८९00, पेरणी-१00७२, टक्केवारी- ३६ टक्के पीकपेरणी

रविवार, १४ एप्रिल, २०१३

                नमस्कार मित्रांनो माझ्या ब्लॉगवर तुमचे मनपूर्वक स्वागत .माझ्या ब्लोगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! मी माझ्या ब्लॉगवर सुरगाण्यातील समाजीक ,संस्कृतिक आणि राजकीय माहिती थोडक्यात आपल्यासमोर सादर करणार आहे .

                                     ...................  प्रवीण जाधव......................

प्रविण जाधव 

मंगळवार, ९ एप्रिल, २०१३



सुरगाणा तहसील कार्यालय {नवीन इमारत }

SURGANA OPERATION : सुरगाणा तहसील कार्यालय फोन नंबर 02593-223323



बुधवार, ३ एप्रिल, २०१३

  1. तत्कालीन  राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यासमवेत सुरगाणा संस्थानाचे राजे पवार राष्ट्रपती




                                                   
                                                   सुरगाणा संस्थान {मोतीबाग }



                                           

                                                       राजे पवार यांच्या कारकिर्दीतील पैसे




सोमवार, १ एप्रिल, २०१३

                         सुरगाणा राजकीय   

सुरगाणा राजकीय

         एकूण मतदान               १४५४५५

एकूण  ग्रामपंचायती       ५८

     सर्वात मोठी ग्रामपंचाय   गोन्दुने 


 




गुरुवार, २८ मार्च, २०१३

हातगड किल्ल्यावरील काही निवडक दृश 


हातगड किल्ल्याचा विस्तीर्ण परिसर 

                                           प्रशासनाच्या हलगर्जीपणामुले किल्ल्याची झालेली नासधूस
किल्ल्यावरील ओसाड परिसर 

मंगळवार, २६ मार्च, २०१३

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

गडावर प्रवेश करण्यापूर्वी चार दरवाजे लागतात.पहिल्या दरवाज्याच्या अगोदरच उजवीकडे कातळात वरच्या भागात कोरलेले पाण्याचे टाके लागते.येथेच कातळात कोरलेली हनुमानाची मूर्ती आहे.गडाच्या पहिल्या दरवाज्याचे फक्त खांब शिल्लक आहेत.या दरवाज्याजवळच दोन शिलालेख कोरलेले आहेत.या दरवाज्यातून थोडे वर चढल्यावर आपण दुसऱ्या संपूर्ण कातळातून खोदलेल्या बोगा सारख्या दरवाज्यातून आत जाता येते. दरवाज्याच्या बाजूला एक गुहासुद्धा कोरलेली आहे यात पाण्याची तीन टाकी आहेत.या दरवाज्यातून थोडे वर गेल्यावर गडाचा तिसरा आणि चौथा दरवाजा लागतो.गडमाथा खूप विस्तीर्ण आहे.दरवाज्यातून वर आल्यावर पायर्यांची एक वाट डावीकडे खाली उतरते.येथे मोठा प्रमाणावर तटबंदी आहे.समोरच एक पीर सुद्धा आहे.उजव्याबाजूच्या तटात एक कमान कोरलेली आहे ,पाण्याचे एक टाके आहे. दरावाज्याच्या उजवीकडची वाट धरावी.येथून थोडे वर गेल्यावर पाण्याचे टाके लागते थोडे अजून वर गेल्यावर पडक्या इमारतींचे अवशेष लागतात.येथे एक बुरुज वजा इमारतही आहे. थोडे खाली उरल्यावर पाण्याचा एक तलाव सुद्धा आहे.यामधील पाणी पिण्यास अयोग्य आहे.तलावाच्या समोरच किल्ल्याचे मोठे पठार देखील आहे.किल्ल्याच्या या भागाची तटबंदी अजूनही शाबूत आहे.तलावाच्या वरच्या बाजूस एक ध्वजस्तंभ आहे.ध्वजस्तंभाच्या पुढे एक वाट गडाच्या दुसऱ्या टोकाला जाते.वाटेत पाण्याची अनेक टाकी लागात. गडाच्या दुसऱ्या टोकाला एक बुरुज आहे.असा हा हातगड नाशिक पासून १०० कि.मी वर आहे .किल्ल्याचे मोठे पठार देखील आहे.किल्ल्याच्या या भागाची तटबंदी अजूनही शाबूत आहे.तलावाच्या वरच्या बाजूस एक ध्वजस्तंभ आहे.ध्वजस्तंभाच्या पुढे एक वाट गडाच्या दुसऱ्या टोकाला जाते.वाटेत पाण्याची अनेक टाकी लागात. गडाच्या दुसऱ्या टोकाला एक बुरुज आहे.